Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

ठरलं! उद्या महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत!

मुंबई | महायुतीचे सरकार स्थापन होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. मात्र त्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार कधी आणि कुठे होणार याबद्दलचीही अपडेट समोर आली आहे. नागपुरात येत्या १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

भाजपाकडून राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, अतुल सावे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, जयकुमार रावल, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भातखळकर, नितेश राणे, गोपीचंद पडळकर या आमदारांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत.

हेही वाचा     –      तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची पहिली उचल ३ हजार २२० रुपये जाहीर: आमदार डॉ.विनय कोरे

शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, आशिष जयस्वाल व योगेश कदम या आमदारांची मंत्रीपदासाठी चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे व मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद तर सना मलिक व इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रीपद मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button