Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘भाजपचे दरवाजे सर्वांसाठी खुले’; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य

नाशिक : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी नाशिकमध्ये बोलताना पक्षवाढीसाठी आपल्या पक्षाची कवाडे सर्वांसाठी खुली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजरांसाठी भाजपने अवघ्या 24 तासांतच आपले दरवाजे खुले केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 15 ऑगस्टला लागेल, असा अंदाजही बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाकरे गटाने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत बुधवारी सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचे संकेत दिलेत. तत्पूर्वी स्वतः बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपण भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट केले होते. पण बडगुजर यांना पक्षात घेण्यास भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. पण आता बावनकुळे यांनी स्वतःच बडगुजर यांना पक्षात घेण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाविषयी गिरीश महाजन लक्ष घालत आहेत. पक्षवाढीसाठी आमची कवाडे सर्वांसाठी खुली आहेत, असे बावनकुळे यांनी याविषयी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा – चर्चगेट रेल्वे स्‍थानकात भीषण आग : स्‍टेशनमध्ये धुराचे लोट

भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मागील 11 वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामांची उजळणी करून ती जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत. आगामी निवडणुकांत आपल्याला एकेक मत महत्वाचे आहे. त्यामुळे कमळ चिन्हावर लढणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला आपल्याला हरू द्यायचे नाही. सर्वांनी असा संकल्प घेतला पाहिजे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण, शेतकरी वीज बिल माफीसारखे निर्णय घेतले होते. आता 15 ऑगस्टला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागेल. त्यामु्ळे आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागतील, असे ते म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button