Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

चिंचवडगावात भाजपाच्या जाहिरातीला काळे फासले!

बालेकिल्ल्यातच भाजपाच्या प्रचाराला गालबोट : शहरात राजकीय चर्चेला उधाण

पिंपरी-चिंचवड | अब की बार ४०० पार, अशी घोषणा देत भाजपने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी प्रचारासाठी भिंती रंगविण्यात आल्या आहेत. मात्र भाजपच्या बालेकिल्ल्यात केशवनगर, चिंचवड येथे एका ठिकाणी भाजपच्या जाहिरातीला काळे फासण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तर अन्य एका ठिकाणी भाजपच्या चिन्हावर महापुरूषाचा फोटो लावून चिन्ह झाकण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार, अशी वाक्य लिहिलेला अन् पक्षाचे चिन्ह असलेल्या भिंती रंगविण्यात येत आहे. केशवनगर, चिंचवड येथील गणेश विसर्जन घाटाजवळ एका सोसायटीच्या भिंतीवर पक्षाचे चिन्ह असलेला मजकूर रंगविण्यात आला आहे. मात्र कोणीतरी या जाहिरातीवर काळ्या रंगाने रंगविण्यात आले आहे.

हेही वाचा     –      मविआच्या जागावाटपाबाबत संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला; म्हणाले.. 

तसेच केशवनगर, चिंचवड येथील गोयल गरीमा या सोसायटी बाहेर रंगविण्यात आलेल्या भाजपच्या जाहिरातीवरील चिन्हावर महापुरूषाचा फोटो लावण्यात आला आहे. या कृत्यांमुळे भाजपच्या बालेकिल्ल्यातच प्रचाराला गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button