Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘द केरळ स्टोरी’ वरून असदुद्दीन ओवेसींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

दिल्ली : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वाद सुरू आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द केरळ स्टोरी सिनेमाचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली आहे. दरम्यान, AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, कर्नाटकात निवडणुका नक्कीच आहेत. परंतु दहशतवाद्यांनी आपल्या पाच जवानांना शहीद केलं. मणिपूरही जळत आहे. गावं, चर्च जळत आहेत. परंतु पंतप्रधान त्या वाईट चित्रपटाबद्दल बोलत आहेत आणि कर्नाटक निवडणुकीत फायदा घेऊ इच्छित आहेत. पंतप्रधान फिल्म प्रमोट करताहेत आणि तिकडे पाकिस्तान आपल्या जवानांना शहीद करतोय.

द केरला स्टोरी हा सिनेमा खोट्या तथ्यांवर आधारीत आहे. आमचा बुरखा दाखवून हे लोक फक्त पैसे कमावू इच्छितात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिरस्कार पसरवत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतकी खालची पातळी गाठली आहे. तुम्ही फक्त भाषण करू नका आपले सैनिक मारणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवा, असंही असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button