शरद पवारांना आता १० वर्षांनी जाग आली का? अण्णा हजारेंचं प्रत्युत्तर

मुंबई | काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे आणि बीएमसीचे माजी अधिकारी जी.आर. खैरनार यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, ते दोघेही आता कुठे दिसत नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली होती. या टीकेला आता अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, शरद पवार यांना १०-१२ वर्षांनी जाग आली आहे. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहिती नाही. त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते. तसेच मी शरद पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील यांच्याविरोधातही आंदोलन केले होते. कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली.
हेही वाचा – कोलकाताची फायनलमध्ये दमदार एन्ट्री! हैदराबादचा 8 गडी राखून पराभव
शरद पवार यांच्या पक्षातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मध्यंतरी माझ्यावर टीका केली होती. मात्र, प्रत्येक पक्षात हे समविचारी माणसं असतात, तसेच शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड हे समविचारी लोक आहेत, ते एकत्र राहणारच, असंही अण्णा हजारे म्हणाले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
माझ्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा तत्कालीन उपायुक्त जी.आर. खैरनार आणि अण्णा हजारे यांनी केला होता. या आरोपांची चौकशीही झाली होती. मात्र, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पुराव्यांनीशी समोर आले होते. माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारे इतरांचे काय झाले? ते आज कुठे आहेत? असं शरद पवार म्हणाले.





