मान्सूनचे आगमन वेळेत; मात्र वितरण विस्कळीत

पुणे : मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात दर वर्षीप्रमाणे वेळेतच होईल. परंतु, अल निनोच्या प्रभावामुळे त्याचे वितरण मात्र विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
यंदा एप्रिलचा पहिला आठवडा अवकाळी पावसाचा ठरला. महाराष्ट्रातील अनेक भागांत गारपिटीसह पावसाने शेतकर्यांचे नुकसान झाले. तसेच एप्रिलमध्ये 112 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. त्यामुळे याचा परिणाम मान्सूनच्या आगमनावर होईल, असे तर्कवितर्क सुरू झाले. यात लाईट फॉल कमी असणे, उन्हाची तीव्रता कमी, वार्याचा वेग जास्त, हिंदी महासागर अन् अरबी समुद्राचे तापमान यावरही चर्चा सुरू आहेत.
हेही वाचा – पिंपरी चिंचवडसाठी अभिमानास्पद बाब.. महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलाची उत्तुंग भरारी; महापौरांकडून सन्मान
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, केरळमध्ये 1 ते 3 जून, तर महाराष्ट्रात ते 10 जून उजाडेल. वितरण मात्र विस्कळीत राहील. अल निनो स्थितीचा परिणाम ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान दिसू शकतो.





