Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबार! मित्रांकडूनच व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

पिंपरी | पुणे शहर आणि परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या घटनांना आणखी एक धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. बुधवारी सायंकाळी पिंपरी परिसरात मित्रांनीच एका व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून हत्या केली. ही घटना दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील अलंकापुरम 90 फुटी रस्त्यावर घडली.

मृत व्यक्तीचे नाव नितीन शंकर गिलबिले (वय 37) असे असून जमीन-खरेदी-विक्री आणि हॉटेल व्यवसायात ते कार्यरत होते. या हत्येत त्यांचेच मित्र अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकूर यांचा सहभाग असल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष निघाला आहे.

हेही वाचा    :          राज्यात सात महिन्यांत चार लाख नावे वगळली, 18 लाखाहून अधिक नवीन मतदार; निवडणूक आयोगाकडून आकडेवारी सादर

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गिलबिले हे बुधवारी सायंकाळी काही ओळखीच्या लोकांसोबत अलंकापुरम रस्त्यावरील एका शेडजवळ उभे होते. यावेळी आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे फॉर्च्यूनर कारमधून तिथे आले. त्यांनी नितीन यांना कारमध्ये बसवून हॉटेलच्या दिशेने नेले.

हॉटेलकडे जात असताना अचानक आरोपींनी नितीन यांच्या डोक्यात गोळी झाडली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेमुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. प्रारंभिक तपासात मित्रांमध्ये आर्थिक व्यवहारांवरून वाद झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button