गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले..

पुणे : भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. दरम्यान, पडळकरांच्या त्या विधानावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, हा असं म्हणाला. तो तसं म्हणाला. याला उत्तर देणं माझं काम नाही. हल्ली वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. त्यांच्या वक्तव्यांकडे मी लक्ष देत नाही.
हेही वाचा – शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. तिथे भाविकांना धक्काबुक्की केल्याच्या घटना समोर येत आहेत. यावरून अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. लालबाग राजाचा देश पातळीवर प्रसिद्ध झालाय, अशातच व्हीआयपी जातात. त्यामुळं सामान्यांना ही तिथं जावंसं वाटतं. हा लालबागचा राजा हा जागरूक गणपती आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळं तिथं दर्शनाला मोठी गर्दी होती. व्हीआयपी साठी वेगळी आणि सामान्यांसाठी वेगळी रांग केलेली आहे. तरी ही अशी परिस्थिती उद्भवली. गणेश मंडळांची ही जबाबदारी असते. सरकार म्हणून आमचे पोलीस त्यांना सहकार्य करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.





