Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

पुणे : अजित पवार यांच्या नेतृत्वात अनेक नेते भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र नव्या संसदेत सुरू झालेल्या अधिवेशनात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार एकत्र आले. याचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यावरून आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, मला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा फोटोवर काहीही बोलायचं नाही. माध्यमं याचा फोटो आणि त्याचा फोटो असं विचारता. माझं ते काम नाही. तुम्ही विकासाबद्दल मला विचारा.

हेही वाचा – गणेशोत्सवादरम्यान ‘या’ शुभ गोष्टी घरी आणा, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही 

मी सातत्याने महाराष्ट्रात फिरत असताना विकास करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी एक भूमिका घेतली आहे. माझं काम त्या पद्धतीने सुरू आहे. मी माझ्या ज्या बैठका घेतो आहे, आढावा घेतो आहे त्यात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रश्नांना गती देतो आहे, असं अजित पवार म्हणाले.

त्यासाठी १५ दिवसांनी, तीन आठवड्यांनी बैठका घेत असतो. ती कामं कशामुळे थांबली आहेत. का पुढे जात नाहीत, काय अडचणी आहेत ते सोडवतो. याचा आढावा घेतला की आपोआप त्या कामाला गती मिळते, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button