शरद पवारांच्या ‘त्या’ निर्णयाबाबत अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले..

मुंबई : अजित पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, यावरून अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले, राज्यातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी, आपली कामं होण्यासाठी, बहुजन समाज, वंचित, गरीब, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक वर्गाचं भलं होण्यासाठी आपण ही भूमिका घेतली आहे. आज ४५-५० आमदार अशी भूमिका घेतात, हे साधी गोष्ट नाही. आम्हीही ३०-३५ वर्षे समाजकार्य-राजकारण केलं आहे. आम्हीही वरिष्ठांचा मान राखला आहे. वरिष्ठांचा आदर केला आहे. वरिष्ठांनी जे सांगितलं त्याची अंमलबजावणी केली आहे, हे सगळ्यांना माहीत आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांचा दसरा गोड; शेतमाल निर्यातीसाठी सरकारची असणार स्वतंत्र कंपनी
२०१४ साली आमच्या वरिष्ठांनी (शरद पवार) भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला. तेव्हा आम्ही गप्प बसलो. त्यांनी घेतलेला निर्णय आम्ही मान्य केला. अशा अनेकदा घटना घडल्या आहेत. त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. त्यातूनच आम्ही ही भूमिका स्वीकारली, असंही अजित पवार म्हणाले.





