breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

शेतकऱ्यांचा दसरा गोड; शेतमाल निर्यातीसाठी सरकारची असणार स्वतंत्र कंपनी

नवी दिल्ली : दिल्लीतील सहकारी निर्यातीवरील राष्ट्रीय परिसंवादात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या औपचारिक शुभारंभ गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच लोगो, वेबसाइट आणि ब्रोशरचे अनावरण देखील शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील उपस्थित होते.

आपल्या देशात आता बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अनेक पुढाकार घेतले आहेत. तसेच मला हे सांगताना आनंद होत आहे की, १२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची NCEL मध्ये नोंदणी झाली आहे. तसेच सहकारी निर्यात संस्था NCEL ला आतापर्यंत ७ हजार कोटी रुपयांच्या निर्यात ऑर्डर मिळाल्या आहेत.

हेही वाचा – निगडीपर्यंत मेट्रो विस्ताराचा मार्ग मोकळा; केंद्र सरकारची मान्यता

नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या स्थापनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांना ५० टक्के नफा मिळणार आहे, असे देखील सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button