Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘राज्यात जोमदार पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे’; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यातील मानाच्या गणपतींसह अन्य गणेश मंडळांना भेट

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. राज्यात ज्या भागात अजूनही पाऊस पडलेला नाही त्या भागातही जोमदार पाऊस पडू दे आणि शेतकरी, बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे असे मागणे श्रीगणेशाकडे मागितल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणींचा देखावा साकारला 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री कसबा गणपतीची आरती केली. तसेच भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालिम मंडळ, तुळशीबाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक वाडा गणेशोत्सव मंडळ, सदाशिव पेठ येथील राजाराम मित्र मंडळ, साने गुरूजी तरुण मंडळ येथे दर्शन घेतले तसेच श्रीगणेशाची आरती केली. यावेळी त्यांचा मंडळांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button