Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी संपली; निर्णय कधी?

मुंबई : राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पार पडली. एकूण ३४ याचिकांवर सुनावणी पार पडणार होती. दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणीसाठी वेळापत्रक आखण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

संजय शिरसाट म्हणाले, आमच्या गटाच्या वकिलांना काही पुरावे दाखल करायचे आहेत, त्यावर सुनावणी झाली पाहिजे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेळापत्रक ठरवण्यात येणार आहे. यासाठी आजचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘राज्यात जोमदार पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे’; उपमुख्यमंत्री अजित पवार

परंतु, ऑनलाईन सुनावणीबाबत जे स्टेटमेंट येत आहेत यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. म्हणून दोन्ही वकिलांच्या संमतीने आजचा निर्णय राखून ठेवतोय, पुढच्या वेळेस वेळापत्रकानुसार सुनावणी घेऊ असं अध्यक्षांनी आजच्या सुनावणीत सांगितलं. विधानसभा अध्यक्ष प्रेस नोटद्वारे सुनावणीचं वेळापत्रक जाहीर करू शकतात. प्रत्येकाचा युक्तीवाद ऐकून घेण्याचं अध्यक्षांनी अशंतः मान्य केलं आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.

पुढील सुनावणी कधी?

पुढची सुनावणी आता १३ ऑक्टोबरला होणार आहे. आजच्या सुनावणी दोन्ही बाजूकडून युक्तीवाद झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीच्या संदर्भात वेळापत्रक जाहीर केले जाईल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button