Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मी कुत्रा निशाणी घेतली तरी जनता मला मतदान करेल’; शिंदे गटातील नेत्याचं विधान

मुंबई | लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दानवेंचा पराभव शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याचं बोलंल जात आहे. यावरून, अब्दुल सत्तार यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. अयोध्येतही भाजप पडली, तिथेही मीच पाडलं का? असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले, रावसाहेब दानवे यांना योग्य वेळात उत्तर दिलं जाईल. त्यांना २५ वर्ष मतदारांनी इथून लीड दिली आहे. माझ्यावर बेछूट आरोप करताना विचार केला पाहिजे. अयोध्येत भाजप पडली तिथे मी पाडलं का? दानवे यांच्या मतदासंघात सर्वाधिक सभा मी घेतल्या आहेत. आरोप करून समाधान वाटत असे तर त्यांनी खुशाल आरोप करावेत. मी एवढा मोठा नाही की खासदार पडेल. मात्र लोक समजतात. आपला पराभव का झाला? याचा विचार रावसाहेब दानवे यांनी करावा.

हेही वाचा     –      रस्ते, पाणी अन्‌ कचरा समस्या प्राधान्यक्रमाने सोडवा!

रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला तर टोपी काढेल असं मी २०१४ मध्ये म्हटलो होतो. त्यानंतर मी त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणलं. आता त्यांना टोपी काढण्याच्या कार्यक्रमालाही बोलवणार आहे. झिरो बजेट लोकांची चर्चा तुम्ही करावी का? खडकू लोक आहेतही. मी त्यांची चर्चा करणार नाही, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

आमच्या मतदारसंघातील गावं आणि तांड्यावर मी सतत फिरत असतो. तुम्ही मतदारसंघात कुणालाही विचारू शकता. मी काही रेडिमेड पुढारी नाही. सोन्याचा चमचा घेऊन आलेला पुढारी नाही. मी कुत्रा निशाणीवरही निवडून येऊ शकतो, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button