Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

महागाईचा भडका! घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला; पाहा तुमच्या शहरातील नवे दर

LPG Price Hike | इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचे जागतिक परिणाम आता भारतीय बाजारपेठेवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर उघडपणे दिसू लागले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनंतर आता घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) किंमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडर थेट २९ रुपयांनी महागला असून, गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. या निर्णयामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे.

या २९ रुपयांच्या दरवाढीमुळे मुंबईत घरगुती सिलिंडरची किंमत ९१२ रुपयांवरून थेट ९४१ रुपयांवर पोहोचली आहे. एलपीजी गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी कंपन्यांना अजूनही प्रति सिलिंडर सुमारे ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगामी काळात सिलिंडरच्या किंमती आणखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील घरगुती सिलिंडरचे नवे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • दिल्ली – ९४२ रुपये
  • मुंबई- ९४१ रुपये
  • कोलकाता- ९६८ रुपये
  • चेन्नई – ९५७ रुपये ५० पैसे
  • पाटणा- १ हजार ३१ रुपये ५० पैसे
  • हैदराबाद ९९६ रुपये
  • लखनऊ- ९८० रुपये
  • जयपूर- ९४५ रुपये
  • बंगळुरु- ९४४ रुपये ५० पैसे

हेही वाचा

राज्‍यात मान्सूनची आगेकूच.! मुंबईसह कोकणात मान्‍सूनची जोरदार हजेरी

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६ महिन्यांत दुप्पट वाढ

घरगुती सिलिंडरसोबतच कमर्शियल (व्यावसायिक) वापराच्या १९ किलोच्या सिलिंडरने महागाईचा उच्चांक गाठला आहे. १ जून रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४२ रुपयांची वाढ करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या अवघ्या पाच ते सहा महिन्यांत १९ किलोच्या सिलिंडरचे दर थेट दुप्पट झाले आहेत.

१ जानेवारीपूर्वी या सिलिंडरची किंमत १,५८० रुपये होती, ती आता १ जूनच्या वाढीनंतर ३,११३ रुपये ५० पैसे झाली आहे. जानेवारीत १११ रुपये, फेब्रुवारीत ४९ रुपये, मार्चमध्ये २८ रुपये, ७ मार्चला ११४ रुपये, एप्रिलमध्ये १९५ रुपये, मे महिन्यात तब्बल ९९३ रुपये आणि जूनमध्ये ४३ रुपयांची वाढ झाली आहे. या प्रचंड दरवाढीमुळे हॉटेलचालक, कॅटरर्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे गणित बिघडले असून, पर्यायाने हॉटेलमधील जेवण आणि बाहेरील खाद्यपदार्थ प्रचंड महागले आहेत.

महागाईचे दुष्टचक्र; चिंता आणखी वाढणार

पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य आणि आता एलपीजी सिलिंडरच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक महागाईच्या खाईत पिचला जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचे दर भडकले असतानाच, देशात आगामी काळात जर पावसाने ओढ दिली, तर अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे दर वाढून महागाईचा आलेख आणखी वर जाण्याची भीती हवामान आणि आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button