तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटींचं अनुदान वितरित होणार!

मुंबई : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात ३ लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरित होणार आहे.
दहा कोटी पेक्षा जास्त कांदा अनुदानासाठी मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर,अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार पर्यत सर्वांना अनुदान जमा होईल.
हेही वाचा – दहीहंडीला पाऊस परतला, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
#कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदान वितरणाचा ऑनलाईन शुभारंभ मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आला.
राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा… pic.twitter.com/B3Ewl80LKp— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 6, 2023
दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेल्या या १० जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची १० हजार पर्यतची देयक आहेत त्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे. आणि ज्या पात्र लाभार्थ्यांचे देयक १० हजार रुपये पेक्षा जास्त आहे त्या लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.




