ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

महापालिकेच्या नवीन चार रुग्णालयात रुग्णसेवा 24 तास सुरू ठेवण्याचे नियोजन

पिंपरी चिंचवड | नवीन भोसरी रूग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन थेरगाव रूग्णालय आणि आकुर्डी रुग्णालय या चार रुग्णालयात 24 तास रूग्ण सेवा सुरू ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. महापालिकेच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात या बाबतची तरतूद करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना 24 तास वैद्यकीय सुविधा मिळणार आहे. परंतु, 24 तास रूग्ण सेवा सुरू करताना आवश्यक मनुष्यबळ कुठून आणणार असा सवाल उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत महापालिका रूग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 24 तास रूग्ण सेवा सुरू करण्यापूर्वी मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक आहे.

महापालिकेच्या ही चारही रुग्णालय नव्याने बांधण्यात आली आहेत. तसेच येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे याचा लाभ शहरातील नागरिकांना होणार आहे. सद्यस्थितीत शहरात असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयापैकी वायसीएम रुग्णालय सर्वात मोठे आहे. वायसीएम मध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. परिणामी येथे उपचार घेण्यासाठी शहराबरोबरच जिल्ह्यातून रूग्ण येत असतात. त्यामुळे सर्वाधिक ताण वायसीएम रुग्णालयावर येतो. ताण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयन्त करण्यात येत आहेत. वायसीएमवरचा ताण कमी करण्यासाठी या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. या चारही रूग्णालयात 24 तास रूग्ण सेवा सुरू झाल्यास वायसीएमवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button