Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बोऱ्हाडेवाडी, जाधववाडीतील प्रस्तावित रस्त्यांच्या कामाला गती

भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांच्या प्रशासनाला सूचना

वाहतूक सक्षमीकरणासाठी पर्यायी रस्ते तातडीने पूर्ण करा

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी

बोऱ्हाडेवाडी-जाधवाडी परिसरातून देहु- आळंदी आणि पुणे-नाशिक महामार्गाला पर्यायी रस्ते आणि इंद्रायणी नदीपात्रालगतच्या प्रस्तावित रस्त्यांची काम तातडीने हाती घ्यावीत आणि नागरिकांसाठी वाहतूक सक्षमीकरण करावी, अशा सूचना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.

भोसरी विधानसभा मतदार संघातील बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी येथे नदी पात्रालगत 18 मीटर रस्ता, चिखली स्मशानभूमी ते नाशिक महामार्गालगतचा 24 मीटर रस्ता आणि जाधववाडी ते बोऱ्हाडेवाडी येथील 30 मीटर प्रस्तावित रस्त्यांची कामे मार्गी लावावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती.

दरम्यान, आमदार लांडगे यांनी महापालिक संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि दुसऱ्याच दिवशी अधिकारी आणि स्थानिक सहकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, नितीन बोऱ्हाडे, अतुल बोराटे, नवनाथ बोऱ्हाडे यांच्यासह महानगरपालिका स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिलदत्त नरोटे, उपअभियंता नरेश जाधव, कनिष्ठ अभियंता इम्रान कलाल, नगररचना विभागाचे उपअभियंता विकास घारे, कनिष्ठ अभियंता संतोष कदम आदी उपस्थित होते.

हेही वाचा  :  ‘गणोजी शिर्केंबाबत चुकीचा इतिहास दाखवला’; शिर्केंच्या वंशजांचा ‘छावा’ सिनेमावर आक्षेप 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

अतिक्रमण कारवाईनंतर डीपी रस्त्यांना चालना

महानगरपालिका प्रशासनाने कुदळवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई केली. त्यामुळे डीपी रस्ते आणि आरक्षणे ताब्यात आली असून, सदर रस्त्यांच्या कामाला चालना मिळाली आहे. बोऱ्हाडेवाडी, जाधवाडीतील पर्यायी रस्त्यांची कामे काही घेवून प्रशासनाने परिसरातील नागरिकांना दिलासा दिला आहे. कुदळवाडीतील कारवाईनंतर आता प्रशासनाने डीपी रस्ते आणि आरक्षण विकासित करण्यावर ‘फोकस’ केला आहे.

देहू-आळंदी मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी सूचना महानगरपालिका अधिकाऱ्यांना केली. 1997 मध्ये महापालिका हद्दीत समाविष्ट गावांमध्ये अद्याप अनेक ठिकाणी डीपी रस्ते विकसित करणे प्रलंबित आहे. 2017 मध्ये रस्त्यांची कामांना चालना देण्यात आली. त्यानंतर कोविड महामारी आणि महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात लांबणीवर पडलेली कामे महायुतीच्या सत्ताकाळात प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button