Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड प्रभाग समिती सभापतीपदावर ‘महिला राज’

सत्ताधारी भाजपाकडून १० पैकी ८ प्रभाग समित्यांवर महिलांची वर्णी

पिंपरी- चिंचवड । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदावर यंदा महिलांचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या १० उमेदवारांपैकी तब्बल ८ महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे प्रभाग समित्यांच्या नेतृत्वात यंदा खऱ्या अर्थाने ‘महिला राज’ दिसून येणार आहे.

महापालिका प्रशासनाने प्रभाग समिती सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, १३ जुलै रोजी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत मतदान होणार आहे. भाजपने सर्व १० प्रभाग समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, विरोधकांकडून उमेदवारी न आल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

या महिलांना मिळाली संधी

  • अ प्रभाग समिती – अर्चना कारंडे
  • ड प्रभाग समिती – सविता खुळे
  • इ प्रभाग समिती – अर्चना सस्ते
  • फ प्रभाग समिती – शिवानी नरळे
  • ग प्रभाग समिती – मनीषा पवार
  • ह प्रभाग समिती – तृप्ती कांबळे
  • ज प्रभाग समिती – आरती चोंदे
  • ल प्रभाग समिती – रेखा देवकर

हेही वाचा

मोरया शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

पुरुष उमेदवार

  • ब प्रभाग समिती – मंदार देशपांडे
  • क प्रभाग समिती – निखिल बोऱ्हाडे

येत्या १३ जुलै रोजी होणार शिक्कामोर्तब…

भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नेतृत्वात महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी देत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रभाग समित्यांच्या माध्यमातून स्थानिक विकासकामांचे नियोजन, नागरिकांच्या प्रश्नांवर निर्णय आणि प्रशासनाशी समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी या सभापतींवर असते. अशा परिस्थितीत १० पैकी ८ समित्यांवर महिला नेतृत्व असणे हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. १३ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर या सर्व नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, भाजपच्या या निर्णयामुळे महापालिकेतील प्रभाग समित्यांमध्ये यंदा ‘महिला राज’ प्रस्थापित होणार असल्याचे चित्र आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button