पिंपरी / चिंचवड

टीव्ही पाहण्यात दंग होती महिला : चोरटे घरात आले अन मंगळसूत्र हिसकावून नेले

पिंपरी l प्रतिनिधी

टीव्ही पाहण्यात मग्न असलेल्या महिलेच्या घरात दोन अनोळखी चोरट्यांनी प्रवेश केला. महिलेचे हात पकडून तिच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री साडेसात वाजता खेड तालुक्यातील देवतोरणे गावात घडली.

मीराबाई ज्ञानेश्वर कुदळे (वय 55, रा. मिसळवाडी, देवतोरणे, ता. खेड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 22) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीराबाई कुदळे शुक्रवारी रात्री साडेसात वाजता त्यांच्या घराच्या हॉलमध्ये टीव्ही पाहत बसल्या होत्या. त्या टीव्ही पाहण्यात एवढ्या व्यस्त होत्या की त्यांच्या घरात चोरटे आलेले देखील त्यांच्या लक्षात आले नाही. 18 ते 20 वयोगातील असलेल्या चोरट्यांनी घरात प्रवेश केला. एकाने मीराबाई यांचे हात पकडले आणि दुस-याने त्यांच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रुपये किमतीचे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि डोरले जबरदस्तीने हिसकावून नेले. त्यांनतर चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.  पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button