पिंपरी / चिंचवड

चांदखेड येथे आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील चांदखेड येथे एका पडक्या घरात एका तरुणाचा मृतदेह आढळला. ही घटना 19 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर यांनी याप्रकरणी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता चांदखेड गावच्या हद्दीत चंदनवाडी येथील अगरवाल यांच्या जमिनीत असलेल्या पडीक खोलीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. मयत तरुणाचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष आहे. त्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता.

अज्ञातांनी त्याला अज्ञात कारणासाठी अज्ञात ठिकाणी मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फरफटत आणत या पडक्या घरात टाकले. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली होती. याचा तपास केल्यानंतर शनिवारी (दि. 22) खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरगाव पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button