पिंपरी / चिंचवड

अनैतिक संबंधाच्या गैरसमजातून पत्नीचा विनयभंग, पतीची बदनामी

पिंपरी l प्रतिनिधी

एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसोबत एकाचे अनैतिक संबंध असल्याचा गरसमज करून घेतला. त्यातून त्याने संशय असलेल्या व्यक्तीला, त्याच्या पत्नीला फोन, व्हाट्सअप आणि मेसेजद्वारे संपर्क करून शिवीगाळ केली. तसेच पत्नी व मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली. हा प्रकार जून 2017 ते 18 जानेवारी 2021 या कालावधीत निगडी पुणे आणि कल्याण वेस्ट, ठाणे येथे घडला.

याप्रकरणी पीडित पुरुषाने शनिवारी (दि. 22) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक आकाशकर (वय 32, रा. उल्लासनगर, ठाणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा गैरसमज आरोपीचा झाला. त्यातून त्याने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या फोनवर वारंवार कॉल, व्हाट्सअप वर मेसेज करून शिवीगाळ केली. फिर्यादीच्या पत्नीवर व मुलीवर बलात्कार करेन अशी आरोपीने धमकी दिली. अश्लील बोलून फिर्यादी यांच्या पत्नीचा विनयभंग केला. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पत्नीचे बनावट फेसबुक अकाउंट सुरु करून त्यावर मसेज करून फिर्यादीची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button