Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: सांगवी येथील उरो जिल्हारुग्णालयातून बारामतीच्या चारजणांना ‘डिस्चार्ज’

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

सांगवी येथील उरो जिल्हा रुग्णालयातून बारामतीच्या एका कुटुंबातील चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर ७ एप्रिल पासून उपचार सुरू होते. १४ दिवसांच्या उपचारानंतर त्यांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हे सर्व जण बारामती येथील आहेत अशी माहिती डॉक्टर प्रशासनाने दिली आहे. यात १ आणि ८ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. इतर आरोग्य कर्मचाऱ्याने टाळ्यांच्या कडकडाटात करोनामुक्तांच स्वागत करत डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यात आलं आहे.

बारामती येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यापैकी एका व्यक्तीला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर चार जणांना औंध उरो जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर डॉ.किरण खलाटे, डॉ.शर्मिला गायकवाड यांनी अथक प्रयत्न करत उपचार केले. यात ८ आणि १ वर्षीय चिमुकलीचा समावेश होता. अशी माहिती तेथील डॉक्टर प्रशासनाने दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button