Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापौर माई ढोरे यांच्या घोषणांची माजी आमदार विलास लांडेंकडून ‘चिरफाड’

  • दुर्बल घटकांना मदत, प्लाझ्मादान प्रोत्साहन मदतीवरुन आरोपाच्या फैरी
  • महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा भाजपाला फटक

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आर्थिक दुर्बल घटकांना ३ हजार रुपये आणि प्लाझ्मादान करणाऱ्यांना दोन हजार रुपयांची मदतीच्या घोषणांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार आणि शहरातील दिग्गज नेते विलास लांडे यांनी चांगलीच चिरफाड केली आहे. महापौर माई ढोरे यांच्या तोंडी सत्ताधारी भाजपाने घोषणा केलेल्या १५ लाख डोसचे काय झाले? असा सवालही लांडे यांनी उपस्थित केला आहे. महापौर माई ढोरे या भाजपाचे मातब्बर नेते लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक आहेत. जगताप आणि लांडे यांची मैत्री राजकारणापलीकडील आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या चुकीच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी माजी आमदार लांडे आक्रमक झाले आहेत.

शांत, संयमी आणि तितकेच चाणाक्ष्य असलेले राजकारणी म्हणून विलास लांडे यांची ओळख आहे. मात्र, मध्यंतरी भाजपामधील नाराज नगरसेवक रवि लांडगे यांनी ‘हे माझं चुकलं का?’ अशी फ्लेक्सबाजी केली होती. त्यानंतर भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना आव्हान देणारा चेहरा आता राष्ट्रवादीला मिळाला, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीला आक्रमक भूमिका मांडत भाजपा पदाधिकाऱ्यांविरोधातील प्रसिद्धीपत्रकांचा सपाटा लावला आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला आव्हान देत लांडे यांनी विविध मुद्दे हातात घेतले. त्यामध्ये शास्तीकर माफी, लसीकरण, कोरोना परिस्थिती आदी मुद्यांवर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना झोडपले आहे. तसेच, वेदिकाच्या उपचारासाठी अगदी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेत सामाजिक भान जपले होते.

  • विलास लांडे यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी…

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आता मुद्देसुद मांडणी करणारा आणि आक्रमकच चेहरा हवा आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने माजी आमदार विलास लांडे यांच्यासाठी २०२२ मध्ये होणारी महापालिका निवडणूक ही रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे मातब्बर, अनुभवी आणि मुरब्बी नेता म्हणून विलास लांडे यांच्याकडे पाहिजे जाते. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह बड्या नेत्यांच्या भेटीगाठी लांडे यांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे लांडे यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button