पिंपरी / चिंचवड

दिघी बोपखेल येथील संकल्प मेळाव्यात विजयाचा एल्गार!

मिशन: PCMC -भाजप उमेदवारांना मोठ्या प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड:  महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ दिघी बोपखेल येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा व्यापक घरोघरी प्रचार व विजयी संकल्प मेळावा उत्साहात पार पडला.

सोमवार दि. १२ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या प्रचार मोहिमेत सुमारे २५० कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार श्रुती विकास डोळस, कृष्णा भिकाजी सुरकुले, हिरानानी गोवर्धन घुले आणि उदय दत्तात्रय गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह राजनंदिनी, गोल्ड क्लिप, आनंद आश्रय, तनिष आयकॉन सोसायटी तसेच समर्थ नगर व परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला.

या वेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, सुरक्षा आणि सामाजिक विकास यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. निवडून आल्यानंतर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास उमेदवारांनी मतदारांना दिला. नागरिकांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला.

हेही वाचा –  नव्या राजकारणाची नवी दिशा : गाठी-भेटींमधून विश्वास निर्माण करणाऱ्या आशाताई भोंडवे

प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या धोरणांची तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती मतदारांना देण्यात आली. सायंकाळी सात वाजता राघव मंगल कार्यालय येथे विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रभागातील कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे आजी व माजी पदाधिकारी, विविध सहकारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विजयी संकल्प मेळाव्यातून आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना नवी दिशा व बळ मिळाले असून प्रभाग क्रमांक ४ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मोठे पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे. या प्रचार मोहिमेमुळे भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button