पिंपरी / चिंचवड

नव्या राजकारणाची नवी दिशा : गाठी-भेटींमधून विश्वास निर्माण करणाऱ्या आशाताई भोंडवे

मिशन- PCMC : “लोकांच्या दारात जाऊन समस्या ऐकणारी, उपाय मांडणारा उमेदवार

पिंपरी-चिंचवड : राजकारण म्हणजे केवळ घोषणा, सभा आणि आश्वासनांचा खेळ—ही पारंपरिक धारणा मोडीत काढत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आशाताई भोंडवे यांनी जनतेशी थेट संवादाचा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. मामुर्डी, किवळे, रावेत आणि गुरुद्वार परिसरात त्या मोठ्या सभांऐवजी गाठी-भेटी, होम मीटिंग्स आणि कोपरा संवादांवर भर देताना दिसत आहेत.

प्रत्येक गल्ली, वस्ती आणि सोसायटीत जाऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, त्यांच्या अडचणी ऐकून घेणे आणि त्यावर ठोस उपाय सुचवणे—ही आशाताईंची प्रचारशैली सध्या प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षितता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी नागरिकांकडून थेट माहिती घेतली असून, त्या समस्यांवर आधारित प्रभागस्तरीय सूक्ष्म जाहीरनामा (Micro-Manifesto) सादर केला आहे.

हेही वाचा –  शेतकऱ्यांसाठी खूषखबर…! पीएम किसानचा २२ वा हप्ता लवकरच मिळणार…

“निवडणूक म्हणजे मत मागण्यापुरती प्रक्रिया नाही, तर जबाबदारी स्वीकारण्याची सुरुवात आहे,” ही त्यांची भूमिका प्रत्येक भेटीतून अधोरेखित होत आहे. विकासनगर, रावेत आणि किवळे भागात झालेल्या गाठी-भेटींमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी प्रलंबित प्रश्न मांडले, महिलांनी सुरक्षेच्या चिंता व्यक्त केल्या, तर तरुणांनी रोजगार आणि सुविधा याबाबत अपेक्षा ठेवल्या. या सर्व मुद्द्यांची नोंद घेत आशाताईंनी केवळ आश्वासन न देता लेखी उपाययोजना मांडण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे त्या हळूहळू “आपली माणूस” अशी ओळख निर्माण करत आहेत.

गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर कृतीशील आराखडा मांडत आशाताईंनी विकासाचे स्पष्ट चित्र समोर ठेवले आहे. “प्रश्न समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाय करणे” ही त्यांची कार्यपद्धती केवळ घोषणांपुरती न राहता कृतीत उतरवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“मी सत्तेच्या मोहासाठी नाही, तर सेवेच्या संधीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. लोकांचे प्रश्न ऐकणे, त्यावर ठोस उपाय देणे आणि बदल घडवणे—हेच माझे राजकारण आहे.”

— आशा भोंडवे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रभाग क्रमांक 16

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button