Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवर ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’

पादचारी व सायकलस्वारांसाठी रस्ते अधिक सुरक्षित होण्यासाठी प्राधान्य

पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्ते अधिक सुरक्षित व सर्वसमावेशक बनवण्याच्या दृष्टिने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत दापोडी, निगडी प्राधिकरणसह शहरातील विविध भागातील रस्ते नागरिकांसाठी सुरक्षित, वाहतुकीच्या सुरळीत संचलनासाठी बनवण्यात येत आहेत. या रस्त्यांवर सलगपणे चालताना पादचाऱ्यांना सुरक्षिततेबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याला प्राधान्य दिले जात आहे.

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर देखील पादचारी नागरिकांसाठी विनाअडथळा फुटपाथ, स्वतंत्र सायकल ट्रॅक, बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासोबत सुरक्षितपणे नागरिकांना रस्ता ओलांडता येईल, यादृष्टिनेही उपाययोजना करण्यात येत आहेत. याच अंतर्गत ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ हा प्रकल्प राबवताना पथदिवे, चौकांची नव्याने रचना, सेवा वाहिन्या याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. ही सर्व कामे ‘इंडियन रोड्स काँग्रेस’ (आयआरसी) च्या मानकांनुसार केली जात आहेत.

पॅरिस, कोपनहेगन आणि अ‍ॅमस्टरडॅम अशा शहरांनी पादचारी आणि सायकलस्वार यांच्यासाठी रस्त्यावर प्रवास सुरक्षित असावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. या शहरांप्रमाणेच आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका पादचारी व सायकलस्वारांसाठी सुरक्षित रस्ते बनवण्यास प्राधान्य देत आहे.

हेही वाचा –  भाजप महिला मोर्चाचा चौंडीला विशेष भेट दौरा

पादचारी व सायकलस्वारांचे सर्वेक्षण

‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना नागरिक, निवासी संस्था, विक्रेते, दुकानदार, वाहतूक पोलीस आदी सर्व घटकांचे आयटीडीपी इंडिया संस्थेने सर्वेक्षण केले. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर केलेल्या सर्वेक्षणात ७९ टक्के नागरिकांनी सांगितले की, रस्त्यांची रचना सुधारली गेल्यास सायकल चालवणे व फुटपाथवरून पायी चालण्याचे प्रमाण वाढेल. ८७ टक्के नागरिकांनी रस्त्याची सुरक्षित रचना आणि जागेचे पुनर्वितरण करण्यास पाठिंबा दिला. ८७ टक्के नागरिकांना रस्ता ओलांडताना असुरक्षित वाटत असल्याचे मत व्यक्त केले. ८२ टक्के नागरिकांनी सध्याचा रस्ता मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांना असुरक्षित असल्याचे सांगितले. ७६ टक्के नागरिकांना रात्री प्रवास करताना समस्या जाणवत होत्या तर ५९ टक्के नागरिकांनी अति वेगाने जाणारी वाहने ही मोठी समस्या असल्याचे मत मांडले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे रस्ते केवळ वाहनांसाठी नाही तर पादचारी, सायकलस्वार यासह सर्वांसाठी सुरक्षित असतील, याकडे प्राधान्याने लक्ष देत आहोत. शहरातील रस्ते सुरक्षित करण्याच्या दृष्टिने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. रस्त्यांची कामे करताना सार्वजनिक-खासगी वाहनांसोबतच पादचारी, सायकलस्वार नागरिक यांचाही विचार केला जात आहे.

– शेखर सिंह,आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button