वैष्णवीचे बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांच्या ताब्यात
वैष्णवीच्या पालकांचा मोठा निर्णय!

पुणे : पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या छळाला तसेच मारझोडीला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊ उचलले. विशेष म्हणजे तिला अवघ्या 9 महिन्यांचा मुलगा आहे. याच मुलाबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांनी ही माहिती दिली आहे.
बाळाचं वजन झालं होतं कमी?
वैष्णवी हगवणे हिला 9 महिन्यांचं बाळ आहे. वैष्णवच्या सासरची मंडळी तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे. विशेष म्हणजे वैष्णवीचा पती शशांक हगवणे यानेदेखील हे बाळ माझे नाही, असे म्हणत कोवळ्या मुलाला नाकारलं होतं. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर हे बाळ हगवणे कुटुंबाकडेच होते. तसेच वैष्णवीचे प्रकरण समोर आल्यानंतर निलेश चव्हाण याच्याकडे हे बाळ होते. या काळात या चिमुकल्याची फार हेळसांड झाली होती. विशेष म्हणजे त्याचे वजनही कमी झाले होते. तशी माहिती वैष्णवीच्या आईवडिलांनी दिली आहे.
हेही वाचा – भाजप महिला मोर्चाचा चौंडीला विशेष भेट दौरा
या बाळाला लहानाचं मोठं करणार
निलेश चव्हाणने दिल्यानंतर आता हे बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांच्या ताब्यात आहेत. या बाळाच्या आगामी संगोपनाबाबत त्यांनी माहिती दिली आहे. ही माहिती देताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. या लहान बाळात आम्ही आमची वैष्णवी शोधत आहोत. हीच आमची वैष्णवी म्हणून आम्ही आता या बाळाला लहानाचं मोठं करणार आहोत. बाळ आमच्याकडे आलं तेव्हा त्याचं वजन खूप कमी होतं, अशी माहिती वैष्णवीच्या आई-वडिलांनी दिली.
आईला अश्रू अनावर
तसेच, शासकीय रुग्णालय वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वैष्णवीच्या आठवणीने स्वाती कस्पटे (वैष्णवी हगवणे हिची आई) यांना अश्रू अनावर झाले होते. या बाळाला कुठल्याही प्रेमाची आम्ही कमी पडू देणार नाही. आता हीच आमची वैष्णवी आहे, असे भावूक होत त्यांनी सांगितले आहे. वैष्णवीला जाऊन आज दहा दिवस झाले आहेत. आज वैष्णवीचा दशक्रिया विधी झाला. दहा दिवसांमध्ये अनेक राजकीय नेते घरी आले. त्यांनी आम्हाला आम्ही तुमच्यासोबत आहोत असं आश्वासन दिलं आहे. मला आशा आहे आम्हाला योग्य न्याय मिळेल. हगवणे परिवारावर कठोर कारवाई व्हावी, अशी इच्छा स्वाती कस्पटे यांनी व्यक्त केली.