Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गृहप्रकल्पात फ्लॅट घेतलेल्या ग्राहकांची फसवणूक; मकरंद पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड: फॉर्च्युन डेव्हलपर्समध्ये मकरंद पांडेकडून कोट्यवधीचा घोटाळा?

पिंपरी-चिंचवड: आळंदी परिसरातील फॉर्च्युन हिलटॉप आणि फॉर्च्युन वेदाज या दोन गृहप्रकल्पांत फ्लॅट घेतलेल्या नागरिकांनी, मकरंद सुधीर पांडे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून, त्यांच्या विरोधात त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.या प्रकरणी तक्रारदार नितीन शंकर धिमधिमे सह अनेक नागरिकांनी पोलीस आयुक्तालयात अर्ज सादर केला असून अर्जात नमूद केल्याप्रमाणे, मकरंद पांडे व नितीन धिमधिमे हे दोघे भागीदार असून त्यांनी एकत्रितपणे संबंधित गृहप्रकल्पांचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, पांडे यांनी बांधकाम अपूर्ण ठेवून जबाबदारी झटकत गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्पातून पळून गेला असून, त्यांचे वर्तन संशयास्पद असल्याची माहिती बिल्डर नितीन धिमधिमे यांनी आज पिंपरी येथे (दि.३०) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी धिमधिमे म्हणाले की,फॉर्च्युन हिलटॉप प्रकल्पाचे बांधकाम ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, तर फॉर्च्युन वेदाज प्रकल्पाचा पहिला टप्पा ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम प्रगतीपथावर नाही. पांडे यांनी काही काळ लोकांशी संवादही टाळला असून, वेगवेगळी कारणे देत वेळकाढूपणा केला आहे. तो तीन कोटी रुपये घेऊन पसार झाला आहे. संपर्क केला असता प्रतिसाद देण्याचे टाळत असून वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत आहे. सदरच्या गृह प्रकल्पांचे काम पूर्ण होणे गरजेचे असून पांडे एकत्रित काम करायला तयार नाही. स्वतः पण काम करत नाही आणि धिमधिमे यांना पण कामाचे अधिकार देत नाही. अशा प्रकारे त्याचे ब्लॅकमेल करणे चालू आहे.

हेही वाचा –  सकारात्मकपणे काम करणारी आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक : माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे

फेसबुक लाईव्हद्वारे पांडे यांच्या गैरवर्तनाची माहिती दिल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांना सत्य परिस्थिती समजली. त्यानंतर झालेल्या बैठका व व्हॉट्सअ‍ॅप संवादांमधूनही पांडे यांनी कोणतेही सहकार्य न केल्याची स्पष्टता आली. नागरिकांनी सांगितले की, पांडे यांच्यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. धिमधिमे यांनी स्वतः सर्व कुटुंबासहीत गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला परंतु नशिबाने त्यातूनही वाचवले असे धिमधिमे यांनी सांगितले.

हा वाद केवळ अंतर्गत नसून फ्लॅटधारकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. गृहप्रकल्पात फ्लॅट घेतलेल्या ग्राहकांनी आपली आयुष्याची पुंजी गुंतवून, बँकांचे हप्ते आणि भाडे भरत असतानाही त्यांना त्यांचे हक्काचे घर भेटलेले नाही. अनेक जेष्ठ नागरिक तसेच श्रमिक वर्गाचे लोक यामध्ये फसवले गेले आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेने पांडे यांच्याविरुद्ध सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी धिमधिमे व तक्रारदारांनी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button