कामगारांकडून पर्यावरणाचा जागर!
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र चाकण, यांच्या वतीने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे राज्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे मनोज पाटील प्र.सहाय्यक कल्याण आयुक्त,पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे वृक्षमित्र आण्णा जोगदंड, गुणवंत कामगार शंकर नानेकर, दत्तात्रय दगडे यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम घेण्यात आला.
हेही वाचा : कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत दोषींवर कारवाई करणार; मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
यावेळी कामगार वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला . यानिमित्ताने विविध जातीची दुर्मिळ औषधी तसेच उत्पन्न मिळवून देणाऱ्या उपयुक्त अश्या 50 वृक्षांचे रोपण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी नागेश दळवी, नितीन पाटील, तान्हाजी दरेकर, पाटिलबुवा गव्हाणे, अविनाश वाडेकर,संभांजी येळवंडे, प्रकाश पटारे,भरत उढाणे व सदाशिव आमराळे या़नी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन कामगार कल्याण के़द्र चाकणचे केंद्र संचालक अविनाश राऊत यांनी केले.





