Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमुंबई

खंडाळा घाटात थरार! : ब्रेक निकामी झालेल्या ट्रकच्या धडकेत तीन ठार, १४ जखमी

बॅटरी हिल उतारावर विचित्र अपघात : नियंत्रण सुटल्याने चार वाहनांना धडक

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाटातील बॅटरी हिल येथील तीव्र उतार व वळणावर एका ट्रकचा ब्रेक निकामी झाला. यामुळे ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या व पुढे जाणाऱ्या चार वाहनांना धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी रात्री उशिरा साडेदहाच्या सुमारास झाला आहे.

निलेश संजय लगड (वय-४२), श्राव्य निलेश लगड (वय-१२), प्रियांका सागर इंगूळकर (वय-३५, तिघेही रा. गिरीशंकर अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर जखमींमध्ये सागर पांडुरंग इंगूळकर (वय-४०), शरयु निलेश लगड, अंशिका विशाल मोगल, आरव विशाल मोगल, हर्ष निलेश लगड, हर्षित निलेश लगड, रुद्राक्ष सागर इंगूळकर (सर्व रा. शुक्रवार पेठ, पुणे), ऋषिकेश रमेश, जाडकर (वय-४५), अश्विनी रमेश जाडकर (वय-४३), ओमकेश रमेश जाडकर (वय-२२), पुष्कर लक्ष्मण शेळकंदे (वय-२५), जिग्नेश रमेश जाडकर (वय-१२), सुमित तुकाराम कदम (वय-२४), संजय नामदेव वाल्हेकर (वय-४२), विमल नामदेव वाल्हेकर (वय-६९, सर्व रा. भिवंडी, ठाणे) यांचा समावेश आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईला जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरून सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकचे (क्रमांक-जीजे-०३/बीटी-६७०१) खंडाळा घाटात खंडाळ्यातील बॅटरी हिल येथील तीव्र उतार व वळणावर ब्रेक निकामी झाल्यामुळे ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुढे जाणाऱ्या इनोव्हा कारला (क्रमांक-एमएच-१९/बीजी-८०६७) मागून जोरात धडकून समोरून येणाऱ्या इर्टीगा कारला (एमएच-१२/युसी-२८००) धडकून पुढे फरफडत नेत पुन्हा समोरुन येणाऱ्या टाटा पंच कारला (क्रमांक-एचआर-३६/एपी-९२५०) व एका रिक्षाला धडक देऊन मार्गालगतच्या टेकडीवर आढळला.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर जोरदार टीका, “निवडणुका हरल्याने त्यांच्या मनावर…”

या विचित्र अपघातात इर्टीगामधील तीन जणांचा मृत्यू झाला तर इर्टीगासह इनोव्हा कारमधील १४ जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील व लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राहुल लाड यांनी सहकार्यांसह तसेच देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी करत अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या जखमींना तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले.या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस उपनिरीक्षक राहुल लाड हे करीत आहेत.

खंडाळा घाटात वाहतुकीचा खोळंबा…

खंडाळा घाटातील या अपघातानंतर घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. साधारण दोन तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यादरम्यान या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button