पिंपरी / चिंचवड
घराच्या उघड्या दरवाजावाटे तीन लॅपटॉप, एक मोबाईल चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी
घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातून तीन लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 8) पहाटे चार ते सकाळी सात वाजताच्या कालावधीत मोशी येथे घडली.
राकेशकुमार संतनु मोहंती (वय 30, रा. संतनगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातून एक अॅपल कंपनीचा व दोन देल कंपनीचे असे तीन लॅपटॉप आणि एक मोबाईल असा एकूण 80 हजारांचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.





