Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

हिंजवडी परिसरात परदेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय

पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रांचकडून कारवाई : चार महिलांची सुटका

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रांचच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने हिंजवडी परिसरातील कासारसाई येथे एका व्हिला मध्ये कारवाई करत चार परदेशी महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. एजंट ग्राहकांना कासारसाई, लोणावळा परिसरात व्हिला बुक करण्यास सांगत त्यानंतर परदेशी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला माहिती मिळाली कि, एक परदेशी महिला एजंट ग्राहकांना व्हाट्स अप कॉल करून लोणावळा परिसरात व्हिला बुक करण्यास सांगते. त्यानंतर परदेशी महिलांना तिथे घेऊन जात त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेते.

हेही वाचा  :  पुणे हादरलं! स्वारगेट बस स्थानकावर २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला असता, संबंधित परदेशी महिलेने एका ग्राहकाला हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासारसाई येथे एक व्हिला बुक करण्यास सांगितले. व्हिला बुक केल्याचे एजंट महिलेला सांगितले असता ती चार परदेशी महिलांना घेऊन आली. त्यानंतर पोलिसांनी एजंट महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण २० हजार २० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. तसेच चार परदेशी महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, मुकुंद वारे, श्रद्धा भरगुडे, नीलम बुचडे, संगीता जाधव यांनी केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button