Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा उलघडणार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा!

दिवंगत हिराबाई लांडगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रम

 पोवाडा, सुश्राव्य गीते तसेच व्याख्यानाचे आयोजन

पिंपरी-चिंचवड :  शांती ब्रह्म सोशल फाऊंडेशनतर्फे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री दिवंगत हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज शंभू शौर्यगाथा ” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

शांती ब्रम्ह सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली. येत्या दि.३१ मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता सेक्टर क्रमांक 6, मोशी प्राधिकरण ग्राउंड, जलवायु विहार येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने सायंकाळी साडेसहा ते सव्वा सात यादरम्यान शाहीर श्री. गुरुप्रसाद नानिवडेकर आणि सहकारी श्री शिव शंभू चरित्र पोवाडा गायन करतील. त्यानंतर अतिथी सन्मान, सुप्रसिद्ध भजन लोकसंगीत गायक, पार्श्वगायक, संगीतकार व अभिनेता अवधूत गांधी यांच्या सुश्राव्य आवाजात विविध लोकसंगीत कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. सायंकाळी 8 वाजता इतिहासाचे गाढे अभ्यासक, प्रभावी वक्ते प्रा. नितीन बानुगडे ‘‘धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज’’ शंभू शौर्यगाथा या विषयावर बोलणार आहेत.

हेही वाचा –  ‘स्व.अण्णासाहेब पाटील यांचे कार्य असंघटित कामगारांसाठी दीप स्तंभासारखे’; कामगार नेते इरफान सय्यद

मान्यवरांची उपस्थिती…!

कार्यक्रमाला अयोध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी श्री गोविंददेव गिरी यांचे शुभाशिर्वाद लाभले आहेत. तर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पी.एम.आर.डी.ए. आयुक्त डॉ. योगेश म्हसे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, संत तुकाराम महाराजांचे 21वे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे, कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, मल्लविद्या भूषण किसनराव लांडगे उपस्थित राहणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button