ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

Mission Assembly Elections:  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चिंचवड विधानसभेची चाचपणी! 

भाजपाअंतर्गत वाद-विवादाचा परिणाम : नव्या चेहऱ्याला संधी देण्याबाबत तर्कवितर्क 

पिंपरी : सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली आहे. शहरात गुजरातचे माजी गृहमंत्री तथा प्रभारी प्रदीपसिंह जडेजा यांनी शहरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपमधील अनेक जण इच्छुक आहेत. काही पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्यामुळे आरएसएसने निष्ठावान भाजपचा सर्वमान्य उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्यासह शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, सिद्धेश्वर बारणे, शितल उर्फ विजय शिंदे इच्छुक आहेत. घराणेशाहीला विरोध करून भाजपमधील काही नगरसेवक वेगळा गट तयार करण्याच्या हालचाली करत आहेत. माजी नगरसेवक संदीप कस्पटे व पदाधिकारी राम वाकडकर यांनी पक्षाला थेट राजीनामा पाठवून नाराजी दर्शवली आहे. यामुळे चिंचवड विधानसभेत नवीन चेहरा देण्याच्या हालचाली भाजपच्या अंतर्गत गोटात सुरू आहेत. 

गुजरातचे माजी गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी शहरात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे बूथरचना , मतदार नोंदणी संदर्भात आढावा घेतला. पक्षाची ध्येयधोरणी, महायुती सरकारने अर्थसंकल्पात जनतेशी संबंधित घेतलेले निर्णय आणि योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन केले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बूथ यंत्रणा मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या. एक दिलाने काम करण्याचा सल्ला दिला.

यानंतरही चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपमधील इच्छुकामध्ये एकमत होताना दिसत नाही. वर्षांवर्ष एकाच कुटुंबात विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व असल्याने इतर भाजपच्या कुशीत तयार झालेल्या आणि निष्ठावान लोकांनीही आगामी उमेदवारी आपल्याला मिळावी म्हणून आग्रही आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा प्रभाव आहे.

आरएसएसच्या विचाराच्या उमेदवाराबाबत चाचपणी… 

या मतदारसंघात भाजप पक्षाची व आरएसएसची विचारधारा असणारा मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने भाजपच्याच उमेदवाराचे प्राबल्य दिसून येते. मात्र, उमेदवार कोण राहणार यावरती या मतदारसंघातील राजकारण बदलताना दिसत आहे. हक्काचा मतदारसंघ हातातून जाऊ नये यासाठी भाजप पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या विचाराचा उमेदवार चिंचवडमध्ये देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेत भाजप पुन्हा विजय संपादन करण्यासाठी नव्या स्वच्छ चारित्र्याचा उमेदवारासाठी चाचपणी करत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button