‘मनशांतीसाठी सूर्य नमस्कार महत्वाचे’; कविता कडू पाटील
शिक्षण विश्व: गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव साजरा

पिंपरी- चिंचवड : हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मनःशांती हरवली आहे आणि आपल्या मनाच्या स्थिरतेसाठी योगा व सूर्यनमस्कार महत्वाचे आहेत. मुलांनी हे तंत्र अवगत करून घेतले पाहिजे असे आवाहन व्यवस्थापकीय संचालिका कविता कडू पाटील यांनी व्यक्त केले.
गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कविता कडू पाटील बोलत होत्या. संस्थाध्यक्ष विनायक भोंगळे, आशा किरण फौंडेशनचे अध्यक्ष रामकृष्ण पालमकर, कार्याध्यक्ष गणेश विपट, खजिनदार म्हाळसाकांत देशपांडे, योगगुरू निर्मलकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.
हेही वाचा : ‘शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले’; मराठी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान
पीसीएमसी परिसरामध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव आयोजित करतात . यावर्षी आशाकिरण फौंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमाला राबविण्यात आले.गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी कामगार नेते सचिन लांडगे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती नोंदविली. यावेळी सचिव संजय भोंगाळे, विश्वस्त सरिता विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व मुख्याध्यापक-उपमुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.