Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

चेन्नई सुपर किंग्सने कौल जिंकत निवडली गोलंदाजी, लखनौचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की..

IPL 2026, CSK vs LSG: आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने आता अंतिम टप्प्यात आले आहेत. अद्याप कोणत्याही संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. चेन्नई सुपर किंग्ने आतापर्यंत 10 पैकी 5 सामन्यात विजय आणि 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे 10 आणि+0.151 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. टॉप 4 मध्ये जागा मिळवायची असेल तर हा सामना विजयासोबत मोठ्या फरकाने जिंकणं भाग आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. पण 14 गुणांचं गणित जुळत असल्याने अजून अधिकृतरित्या संघ बाहेर झालेला नाही. आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्सने 10 पैकी 3 सामन्यात विजय आणि 7 सामने गमावले आहेत. त्यामुळे 6 आणि नेट रनरेट -0.934 असून दहाव्या स्थानावर आहे. हा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. असं असताना नाणेफेकीचा कौल हा चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने लागला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खेळपट्टीवर आच्छादन होते आणि आजूबाजूला पाऊसही होता. दिवसाच्या सामन्यांमध्ये खेळपट्टी वेगळी वागते, पण आम्हाला परिस्थितीशी चांगल्या प्रकारे जुळवून घ्यावे लागेल आणि मग त्यांना कमी धावसंख्येवर रोखावे लागेल. गेल्या 7-8 सामन्यांमधील आमच्या कामगिरीबद्दल आम्ही खूप सकारात्मक आहोत. हा एक चांगला बदल आहे आणि आम्ही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्याच संघासोबत खेळत आहोत.’

हेही वाचा –  ‘हे’ पदार्थ तुम्ही जुने झाले तरी खाऊ शकता, ते कधीच खराब होत नीहीत

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. आम्हाला सर्व सामने जिंकायचे आहेत, पण त्यासाठी सातत्य राखून चांगला क्रिकेट खेळावा लागेल. आम्हाला संधी मिळाल्या होत्या, पण आम्ही त्या साधू शकलो नाही. आम्हाला प्रत्येक सामन्यात 200% द्यावे लागतील. दोन बदल केले आहेत. दुखापतीनंतर इंग्लिस संघात आला आहे, आवेश मयंकच्या जागी खेळेल.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), एडन मार्कराम, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, मोहम्मद शमी, दिग्वेश सिंग राठी, प्रिन्स यादव.

चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, अकेल होसेन, अंशुल कंबोज, नूर अहमद, मुकेश चौधरी.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button