विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला !
शिक्षण विश्व: राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या वतीने शिवजयंती साजरी

पिंपरी : भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
राजमाता जिजाऊ कॉलेज भोसरी येथील कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य रॅली काढून घोषणा दिल्या.
हेही वाचा : ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले..
प्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी केली. त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार विलास लांडे, प्राचार्य डॉ.कानडे , प्रा किरण चौधरी , अश्विनी भोसले, डॉ बागुल सर, डॉ. चौधरी, डॉ कुंभार, डॉ शेळके, प्रा भालेराव, डॉ दानी मॅडम, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार विलास लांडे म्हणाले राजमाता जिजाऊ महाराज यांनी जसे शिवाजी महाराज घडविले. त्या प्रमाणे सर्वांनी त्यांचा आदर्श घेत देशाची सेवा करावी व आपले राज्य शिवराज्य बनवावे.