ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
विद्यार्थ्यांच्या भाषणांमधून उलगडली शिवरायांच्या पराक्रमाची शौर्यगाथा!
शिक्षण विश्व: प्रियदर्शनी स्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

पिंपरी- चिंचवड : आळंदी येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची यशोगाथा उलगडली.
आळंदीतील प्रियदर्शनी स्कूलच्या सर्वेसर्वा सरिता सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून उत्तम सराव करून घेतला. ज्यातून विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे कलागुणांचे कार्यक्रम सादर केले. असे कौतुक सरिता सिंग यांनी केले.
हेही वाचा : ..म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले नाहीत; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
शिवाजी महाराजांच्या शौर्य, नेतृत्व आणि दूरदृष्टीचा विद्यार्थ्यांनी भाषणांमधून उजाळा दिला. यावेळी पोवाडा देखील सादर करण्यात आला.