Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..

Devendra Fadnavis | गेल्या आठवड्यात सर्वत प्रदर्शित झालेला, विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ सिनेमा हा सध्या बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घालत आहे. दरम्यान राज्यात हा चित्रपट करमुक्त केला जावा अशी मागणी केली जात आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीबद्दल महत्वाचे विधान केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की मला एका गोष्टीचा आनंद आहे की, छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, विरता आणि विद्वत्ता प्रचंड होती, पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. ज्यांच्याबद्दल ‘देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था’, असं म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला, इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक असा सिनेमा तयार झाला आहे. त्याबद्दल सिनेमाचे निर्माते, निर्देशक आणि प्रमुख भूमिका करणारे विकी कौशल यांचे मानापासून अभिनंदन करतो.

हेही वाचा  :  Pune | शिवजयंतीनिमित्त पीएमपीच्या मार्गात बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती 

मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की, हा सिनेमा टॅक्स फ्री करा. पण मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा जो करमणूक कर असतो तो माफ केला जातो. महाराष्टाने २०१७ सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात करमणूक कर हा नेहमी‍करिता रद्द केला आहे. आपल्याकडे (महाराष्ट्रात) करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही. तसेच त्यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता किंवा छत्रपती शंभू राजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी आपल्याला अधिक काय चांगलं करता येईल ते आपण करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button