Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

कुसुमाग्रज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेचा जल्लोषात समारोप

शिक्षण विश्व: विविध साहित्यप्रकारांचे प्रभावी अभिवाचन

पिंपरी-चिंचवड : मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोरया शिक्षण संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात व जल्लोषात पार पडला.

महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड, पुणे, नगर, बारामती, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आदी विविध जिल्ह्यांतून सुमारे २५० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कथा, कविता, निबंध, नाट्यसंवाद व नाटक अशा विविध साहित्यप्रकारांचे प्रभावी अभिवाचन सादर करत स्पर्धकांनी मराठी भाषेची गोडी, समृद्धता व अभिव्यक्तीची ताकद प्रभावीपणे प्रकट केली.

कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते व दिग्दर्शक मा. श्री. किरण यज्ञोपवीत तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. मंदार देशपांडे यांच्या हस्ते सरस्वती व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ‘स्व. विनायक माटे विज्ञान नगरी’ व ‘स्व. श्रीमती शकुंतला माटे साहित्य नगरी’चे उद्घाटनही करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले विज्ञान प्रकल्प, मराठी साहित्यिकांची पोस्टर्स तसेच कार्यानुभवांतर्गत तयार केलेल्या हस्तकला वस्तूंचे मान्यवरांनी कौतुकपूर्वक निरीक्षण केले.

हेही वाचा –  महायुती सरकारचा मोठा निर्णय; जिल्हा परिषद-पंचायत समित्यांत सदस्यसंख्या वाढणार, राजकीय हालचालींना वेग

कार्यक्रमाच्या प्रारंभी कु. अनुष्का लोहार व कु. ओवी नेने यांनी सादर केलेल्या नांदीगायनाने वातावरण भारावून गेले. सौ. प्राची जोशी यांनी पाहुण्यांची ओळख करून देत स्वागत केले. संस्थेच्या कार्यवाह, तहयात विश्वस्त व प्राचार्या सौ. इंद्रायणी माटे पिसोळकर यांनी प्रास्ताविकात उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करत सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण होऊन आत्मविश्वास वाढावा, अभिवाचन कौशल्य विकसित व्हावे आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने २०२२ पासून हा उपक्रम राबविण्यात येत असून हे या स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे. “हा केवळ उपक्रम नसून मराठी भाषा संवर्धनाची चळवळ आहे,” असे त्या म्हणाल्या.

विजेत्यांना पारितोषिक…

स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्यांना प्रथम (₹५०००), द्वितीय (₹३०००), तृतीय (₹२०००) तसेच उत्तेजनार्थ (₹१०००) रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे किरण यज्ञोपवीत व श्री. मंदार देशपांडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. मनोगतात किरण यज्ञोपवीत यांनी अशा उपक्रमांमुळे मराठी भाषेच्या प्रचार-प्रसाराला चालना मिळत असल्याचे नमूद केले. श्रीमती पार्वतीबाई विद्यालयाचे माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित नगरसेवक श्री. मंदार देशपांडे यांचा संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. स्वप्निलजी शेडगे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

राज्यस्तरीय साहित्य सोहळा…

इयत्ता सातवी ‘ब’ मधील कुमार अविष्कार बदर याने ‘प्रतापगडाचे युद्ध’ हा पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या सादरीकरणाला ढोलकीवर यशवंत, पेटीवर अनुष्का लोहार व तबल्यावर शार्दुल देशिंगे यांनी सुरेख साथसंगत केली. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. स्वप्निल शेडगे, खजिनदार अॅड. रणजीत सावंत, तहयात विश्वस्त श्री. ऋत्विक पिसोळकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नवीत झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे. प्रशांत गाडेकर व श्री. हनुमंत हुचगोळ यांनी केले, तर श्री. यश अग्रेसर यांनी आभार प्रदर्शन केले. स्पर्धक, विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा राज्यस्तरीय साहित्य सोहळा अत्यंत जल्लोषात संपन्न झाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button