Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लघुशंका केल्याप्रकरणी चाकूने वार

पिंपरी: मिलिंदनगर पिंपरी येथील कमानीजवळ एक व्यक्ती लघुशंका करत होता. त्याच्यावर एकाने चाकूने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. १४) मध्यरात्री घडली.

भूषण राजू डुलगूच (वय ३४, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद म्हस्के (वय ४०, रा. पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा –  जागेच्या वादातून दोघांना मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भूषण हे मिलिंदनगर येथे कमानीजवळ लघुशंका करत होते. त्यावेळी इथे लघुशंका करू नका असे आरोपीने सांगितले. त्यावर ‘तू कोण मला विचारणारा’ असे फिर्यादी यांनी विचारले असता आरोपीने चावीच्या गुच्छातील चाकूने भूषण यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button