Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुनावळेतील ‘7 Plumeria Drive’ सोसायटीत क्रीडा महोत्सव २०२५चा जल्लोषपूर्ण प्रारंभ!

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते भव्य उद्घाटन; १३ क्रीडा प्रकारांत ५७० स्पर्धकांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड: पुनावळे येथील 7 Plumeria Drive Housing Society येथे आज सायंकाळी उत्साह, जल्लोष आणि क्रीडाभावनेने नटलेला “क्रीडा महोत्सव २०२५”चा भव्य शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.

या वर्षीच्या महोत्सवात तब्बल १३ विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला असून, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, स्क्वॅश, स्वीमिंग, बॅडमिंटन तसेच ५००० आणि १०००० मीटर धावण्याच्या स्पर्धा रंगणार आहेत. सुमारे ५७० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग या सोसायटीतील क्रीडावैभव अधिक उजळवून गेला आहे. पुढील दोन महिन्यांपर्यंत या सर्व स्पर्धा रंगणार असून, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांसाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आले आहेत.

उद्घाटनप्रसंगी आमदार शंकर जगताप म्हणाले, “सामाजिक स्वास्थ्य आणि शांती टिकविण्यासाठी समाजात खिलाडूवृत्ती रुजविणे अत्यावश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे समाज एकत्र येतो, ताणतणाव कमी होतात आणि आरोग्यदायी जीवनशैली विकसित होते.”

हेही वाचा –  ‘मोंथा’ चक्रीवादळ परतले, पण… आजही वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चेतन भुजबळ, संदीप पवार, सोसायटी स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष विनोद मुळीक, फेडरेशनचे चेअरमन डॉ. गणेश भामे, तसेच अमोल डोंगरे, राहुल पवार, योगेश जाधव, अभि गायकवाड, श्रेयस मोहिते, उपेंद्र खांबेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान सोसायटी परिसर उत्साहाने भरून गेला होता. रहिवाशांनी “खेळा, जिंका आणि मैत्री जोडा!” या घोषवाक्याने एकत्र येत क्रीडाभावनेचा खरा अर्थ साकारला. उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग आणि उत्साहाच्या माध्यमातून सोसायटीतील एकात्मतेचा आणि बंधुत्वाचा सुंदर संदेश दिला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून, ती एक संस्कार प्रक्रिया आहे. मैदानावर घाम गाळणारा प्रत्येक खेळाडू समाजात एकतेचा, शिस्तीचा आणि सकारात्मकतेचा संदेश देतो. अशा क्रीडा महोत्सवांमुळे नव्या पिढीत आत्मविश्वास, संघभावना आणि आरोग्याची जाणीव जागृत होते. त्यामुळे प्रत्येक सोसायटी, प्रत्येक परिसरात असे उपक्रम वाढले पाहिजेत.”

– शंकर जगताप, आमदार, भाजपा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button