Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

सिद्धीविनायक मंदिर ‘या’ तारखेपासून सलग ५ दिवस बंद; जाणून घ्या कारण

मुंबई : सिद्धीविनायक भक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दादरमधील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर पुढील काही दिवस भाविकांच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी बंद राहणार आहे. महाराष्ट्रासह देश-विदेशातून दररोज हजारो भाविक सिद्धीविनायक गणपतीच्या दर्शनासाठी येत असलेल्या या मंदिरात दरवर्षी पार पडणाऱ्या धार्मिक परंपरेनुसार काही काळासाठी गाभाऱ्यातील मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन बंद ठेवले जाणार आहे.

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. ट्रस्टकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गाभाऱ्यातील श्री गणेशाच्या मूर्तीवर पारंपरिक सिंदूर लेपनाचा विधी करण्यात येणार आहे. हा विधी अत्यंत श्रद्धेने आणि विधीवत पद्धतीने केला जातो. या काळात मूर्तीवर हाताळणी आणि धार्मिक प्रक्रिया सुरू असल्याने भाविकांना प्रत्यक्ष दर्शन देता येणार नाही.

तथापि, मंदिर पूर्णपणे बंद ठेवले जाणार नाही. भाविकांच्या भावनांचा विचार करून मंदिरात श्री गणेशाच्या छायाचित्राचे दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जेणेकरून भाविक दर्शन घेऊ शकतील. ट्रस्टने या कालावधीत भाविकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा –  विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेची जोरदार मुसंडी!

ट्रस्टच्या माहितीनुसार, ७ जानेवारी ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. या पाच दिवसांत सिंदूर लेपनाचा विधी, स्वच्छता आणि संबंधित धार्मिक प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहेत. या काळात मंदिर परिसरात नेहमीपेक्षा गर्दी कमी राहण्याची शक्यता असल्याने भाविकांनी त्यानुसार नियोजन करावे, असेही सांगण्यात आले आहे.

सिंदूर लेपन विधी पूर्ण झाल्यानंतर १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी विधीवत पूजा-अर्चा होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले होईल आणि श्री सिद्धिविनायकाच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू होईल.

दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर हे देशातील अत्यंत श्रद्धास्थान असल्याने या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी ट्रस्टच्या सूचनांचे पालन करावे, गर्दी टाळावी आणि धार्मिक परंपरांचा सन्मान राखावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button