Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Breaking New | भारताला मिळाली नवीन धनुर्विद्या जागतिक विजेती!

पिंपरी-चिंचवडच्या शर्वरी शेंडे आणि प्रिथिका प्रदीप यांचा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत डंका

पिंपरी-चिंचवड | कॅनडाच्या विनिपेग येथे 19 ते 25 ऑगस्टदरम्यान झालेल्या जागतिक युवक धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या शर्वरी सोमनाथ शेंडे आणि प्रिथिका प्रदीप यांनी भक्कम कामगिरी करत भारताच्या पदक तालिकेत भरीव भर घातली आहे. 18 वर्षांखालील गटात शर्वरीने रिकर्व वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावत इतिहास घडवला, तर प्रिथिकाने कंपाऊंड प्रकारात दोन रजत पदके मिळवत आपल्या कौशल्याची छाप जागतिक स्तरावर उमटवली.

शर्वरी शेंडे हिने रिकर्व प्रकारात अप्रतिम खेळी करत उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या खेळाडूचा 7–3 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत कोरियाच्या अव्वल मानांकित धनुर्धरावर देखील 7–3 ने मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात कोरियन प्रतिस्पर्ध्याशी सामना 5–5 असा बरोबरीत गेला. निर्णायक टाय शॉटमध्ये शर्वरीने अचूक 10 गुणांचा निशाणा साधत सुवर्ण पदकावर भारताचे नाव कोरले. या आधीच्या सांघिक प्रकारात तिने कांस्य पदक देखील मिळवले.

हेही वाचा     :        युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर थेट हल्ला, जगभरात चिंता वाढली 

प्रिथिकाचे दुहेरी रजत पदकाने यश

प्रिथिका प्रदीप हिने कंपाऊंड प्रकारात झुंजार खेळी करत उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या खेळाडूचा 140–125 असा पराभव केला. उपांत्य फेरीत भारतीय प्रतिस्पर्ध्यावर 130–128 अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात मात्र अमेरिकेच्या खेळाडूसमोर 140–143 अशा थोडक्याच फरकाने पराभव पत्करावा लागला आणि रजत पदकावर समाधान मानावे लागले. तसेच तिने सांघिक प्रकारातही रजत पदक मिळवून एकूण दोन पदकांची कमाई केली.

स्वराज्य आर्चरी अकॅडमीचा शिरपेचात मानाचा तुरा

या दोन्ही खेळाडूंचे प्रशिक्षण पिंपरी चिंचवड येथील सह्याद्री स्पोर्ट्स फाउंडेशन संचालित स्वराज्य आर्चरी अकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक कुणाल तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. मागील काही महिन्यांत अनेक अडचणी, अपुरी साधनं, आणि मैदानाच्या अनुपलब्धतेनंतरही या दोघींचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा संघर्ष सुरू राहिला. या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी प्रशिक्षक तावरे यांना दिले असून, या कामगिरीने भारताला एक नवीन जागतिक विजेती आणि दोन पदक विजेत्या खेळाडूंचा बहुमान मिळवून दिला आहे. पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button