ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘‘शिवराय आपल्या मनामनांत,शिवजयंती साजरी करु घराघरांत.. !’’

शिवराज लांडगे : इंद्रायणीनगर परिसरात विधायक उपक्रम

पिंपरी-चिंचवड : राजाधिराज छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस साजरा करणेबाबत जनजागृती करण्याचा विधायक उपक्रम भाजपाचे युवा नेते शिवराज लांडगे यांनी घेतला आहे.

प्रखर हिंदूत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज लांडगे यांनी घराघरात शिवजयंती साजरी करण्याचा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाला सर्वसामान्य नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘‘शिवराय आपल्या मनामनांत,शिवजयंती साजरी करु घराघरांत.. !’’ असा हा उपक्रम पिंपरी-चिंचवडमधील एकमेव आहे.

शिवराज लांडगे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज या नावात अख्खा महाराष्ट्र सामावलेला आहे. सह्याद्रीचे कडेकपार, दरी, डोंगर जेवढ्या वळणघाटाने युक्त तेवढाच शिवबा ते छत्रपती शिवाजी हा संपूर्ण प्रवास व्यापलेला आहे. अगदी इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र असे कित्येक विषय या एकाच व्यक्तिमत्वाभोवती गुंफलेले आहेत. अठरापगड समाजातील प्रत्येकाला आपल्या छत्रछायेत विशिष्ट स्थान देणारा एकमेव नेता म्हणून आजही त्यांचीच छबी राजकीय पटलावर आहे. दूरदृष्टी, साहसी वृत्ती, माणसांच्या गुणांची कदर आणि न्यायाची चाड या चतुर्भूजांसह शत्रूला नामोहरम करणारा हा आपला राजा. हिंदवी स्वराज्याचा छत्रपती आहे.

हेही वाचा  :  कोथरूड येथे २० फेब्रुवारी पासून संत्रा महोत्सवाला सुरुवात 

बालसवंगड्यांसमवेत विटीदांडू खेळण्याच्या वयात रायरेश्वराला ज्यानं स्वराज्याची शपथ घेतली तो आदर्श प्रत्येक कोवळ्या मनाने घ्यायला हवा. तलवारीच्या पात्यांची धार दुर्ग, जलदुर्गांमध्येही तळपवण्याची सळसळ शालेय मावळ्यांत निर्माण व्हावी आणि म्हणूनच अशा या थोर राजाचा जन्मदिवस आपण आपल्या घरात तसेच सोसायटी परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहनही शिवराज लांडगे यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button