‘पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करा’; नाना काटे
आयुक्तांना निवेदन; पूरसदृश्य स्थिती टाळण्यासाठी मागणी

पिंपरी चिंचवड :पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई करण्यात यावी अशी मागणी माझी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये नाना काटे यांनी म्हटले आहे, पावसाळ्यापूर्वी महापालिकेतर्फे शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई केली जाते. परंतु यावर्षी तसे केल्याचे दिसत नाही कारण सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, व या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शहरातील सर्व स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले यातील कचरा साफ न केल्याने स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन तुडुंब भरून जागो जागी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असून नागरिकांना वाहने चालवताना, रस्त्याने चालताना अडचणीना सामोरे जावे लागत आहे तसेच या साचलेल्या पाण्याने घणीचे साम्राज्य पसरत असून नगरिकाना आरोग्याच्या समस्येला देखील सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा – आता समुद्राचे खारे पाणी करता येणार गोड; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांची कामगिरी
पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये नुकताच अवकाळी पाऊस झाला. या पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुमच्या घटना समोर आल्या. अवकाळी पावसाने जर शहराचे हे हाल होत असतील तर मान्सूनच्या पावसामध्ये शहराची अवस्था जलमय होईल व संपूर्ण शहराला मोठया संकटाला सामोरे जावे लागेल अशी भीती देखील नाना काटे यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.