ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रसंग आल्यावर प्रतिकार हा केलाच पाहिजे !

दुर्गा भोर : निर्भय कन्या अभियान अंतर्गत महिलांचे स्वसंरक्षण व प्रात्यक्षिके कार्यशाळा

पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा व संस्थेच्या खजिनदार डॉ . भूपाली शहा यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांच्या संयोजन व अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयांच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने निर्भय कन्या अभियान अंतर्गत महिलांचे स्वसंरक्षण व प्रात्यक्षिके कार्यशाळेचे उद्घाटन दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अँड. मोहिनी सूर्यवंशी, इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर , महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, विद्यार्थी कल्याण मंडळाच्या प्रमुख प्रा. गीता कांबळे, अवंतिका भोर आदी उपस्थित होते.

शिक्षणशास्त्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर पुढे म्हणाल्या, कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शाह सुरक्षेबाबत मोहीम राबवित आहे ही अभिमानाची बाब आहे. ही चळवळ सर्वत्र तळागाळात पोहोचली पाहिजे. देशभरात विविध क्षेत्रात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे व आजही पार पाडीत आहे. आजची महिला सक्षम आहे परंतु प्रसंगात एक पाऊल पुढे टाकण्यात कधी कधी कच खातात. प्रसंगी प्रतिकार हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. त्यासाठी प्रथम कायदे देखील समजावून घेतले पाहिजे. आज ही मुलींना मारहाण, छेडछाड, जाळून मारले जातात. भारतीय संविधानात कायदे आहेत पळवाट देखील आहेत.

हेही वाचा  :  ‘मंदिरं सामाजिक समतेची केंद्र व्हावीत’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आर्थिक फसवणूक, मोबाईलवर स्क्रीन शॉट काढून छेडछाड , आदीत महिला, विद्यार्थींना अनेक प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ आलीच तर घाबरून न जाता न्याय, हक्कासाठी प्रत्येकाने झगडले पाहिजे. कुणाला मदत हवी असेल तर आमची संघटना सदैव आपल्या पाठीशी असेल, अतिप्रसंगाची घटना महिलांवर घडलीच तर त्वरीत एक पाऊल पुढे टाकून प्रथम नजीकच्या पोलीस चौकीत जावून रीतसर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करून प्रत्येकाने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहनही यावेळी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थिताना स्वसंरक्षण कसे करावयाचे , प्रसंगावधान राखून प्रतिकार कसा करावयाचा यांची प्रात्यक्षिके अवंतिका भोर व तिच्या सहकाऱ्यांनी करून दाखविले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. गीता कांबळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय विद्यार्थिनी अपेक्षा स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन शीतल डुंबरे यांनी तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

महिला कायद्यांची जनजागृती हवी…
कायदेशीर सल्लागार ॲड. मोहिनी सूर्यवंशी म्हणाल्या की, समाजात सासू-सासरे जेथे काम करतात तेथे सुरक्षितता नाही असे महिलांना आढळून आल्यास, त्यानी मोबाईल वरून ऑनलाईन तक्रार देखील दाखल करता येते. महिलांसाठी बरेचसे कायदे आहेत त्याची माहिती करून घेणे प्रत्येकाने आवश्यक असून कायद्याचे ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. आपल्या अज्ञानामुळेच आपल्यावर अन्याय होतो.स्त्री अत्याचाराच्या घडलेल्या अनेक केसेसची माहिती सर्विस्तरपणे यावेळी देण्यात आली.

महिला सुरक्षा प्रशिक्षण आवश्यक …
इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रात स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता ही काळाचीच गरज आहे. पिंपरी चिंचवड शहरात उद्योग , लधू उद्योग आदी ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात नोकरी करतात. अशा महीला , विद्यार्थिनीने प्रशिक्षण घेणे गरजेचे देखील आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button