सेमिनार, पोस्टर, आर्टिकल, टेक रांगोळीतून रंगली “आरडीएस2के25” स्पर्धा
शिक्षण विश्व: आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील ४२६ विद्यार्थ्यांचा सहभाग

पिंपरी : सिकिंग, सेमिनार, पोस्टर, रील इट विन इट , आर्टिकल, टेक रांगोळी या विविध उपक्रमातून “आरडीएस2के25” स्पर्धा रंगली. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रो. रामकृष्ण मोरे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात “आरडीएस2के25” उत्साहात साजरा करण्यात आला.
रुल द एक्सिलेन्स या स्पर्धेचे आयोजन ७ आणि ८ फेब्रुवारी या दिवशी करण्यात आले. या अंतर्गत आरडीएस2के25 या स्पर्धेत सिकिंग, सेमिनार, पोस्टर,रील इट विन इट , आर्टिकल, टेक रांगोळी या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी एटीएसएस कॉलेजच्या डॉ. विनया केसकर, प्रा. अभय खंडागळे व उपप्राचार्य हिरालाल सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
हेही वाचा : ‘पीसीसीओई’च्या टीम क्रॅटोस रेसिंगचा फॉर्म्युला भारत-2025 मध्ये विक्रम!
या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड मधील सर्व महाविद्यालयातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला एकूण ४२६ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. या प्रसंगी प्रा. रुपाली काळे,प्रो.श्रेया गोरे, डॉ. रामदास पवार , डॉ. सविता वेणेगुरकर, प्रो.विष्णु गाडे,डॉ. मधुकर पालवे व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. या स्पर्धेसाठी डॉ. पद्मावती इंगोले, डॉ. रामदास लाड,प्रो. गंगाधर किटाळे,प्रो. विक्रांत शेळके, प्रो. विवेक कोल्हे यांनी परीक्षकाचे कामकाज पाहिले.
डॉ. विनया केसकर यांनी अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत व्यक्तिमत्वाला आकार मिळतो. यासाठी मार्गदर्शन केले डॉ. अभय खंडागळे यांनी संगणक क्षेत्रातील विविध विषयांवर मुलांना मार्गदर्शन केले. संगणक शास्त्र विभागाच्या प्रमुख प्रो. रुपाली काळे यांनी मुलांच्या कालगूंणाना वाव मिळावा म्हणून मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा .वर्षा टेमगिरे यांनी काम पाहिले. त्यांना संगणक शास्त्रातील इतर सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.