सर्दी आणि खोकल्याचा त्रास वारंवार होतो, तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत
सकाळी गारवा अन् दुपारी उकाडा!

मुंबई : सध्या वातावरणात सकाळी गारवा तर दुपारी उकाडा जाणवत आहे. यामुळे अनेकांना आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होत आहे. यात अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत आहे. पण असे होणे सामान्य आहे. पण काही लोकांना वारंवार सर्दी आणि खोकला होतो. जर तुम्हाला देखील वारंवार सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करण्यासाठी पुढील काही गोष्टी करू शकता.
जर तुम्हाला खोकला आणि सर्दीचा वारंवार त्रास होत असेल तर सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात चिमूटभर मीठ टाकून गुळण्या करा. यामुळे आराम मिळेल. बदलत्या वातावरणात वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर आयुर्वेदिक दुकानातून आयुर्वेदिक औषध खरेदी करा आणि ते सेवन करा. यामुळे तुमच्या सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळू शकतो.
हेही वाचा : ‘पीसीसीओई’च्या टीम क्रॅटोस रेसिंगचा फॉर्म्युला भारत-2025 मध्ये विक्रम!
कोमट पाणी प्या
तुम्हाला वारंवार सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर दिवसभरात कोमट पाणी थोडे थोडे प्या. यामुळे आराम मिळेल.
नारळ तेल लावा
झोपण्यापूर्वी कानात आणि नाकात नारळाचे तेल लावा आणि नंतर झोपा. यामुळे बदलत्या वातावरणात त्रास होणार नाही.
व्हिटॅमिन ए आणि सी सप्लिमेंट्स
व्हिटॅमिन ए आणि सी च्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. नाश्त्यानंतर व्हिटॅमिन ए आणि सी सप्लिमेंट्स घ्या. यामुळे बदलत्या वातावरणात तुम्हाला त्रास होणार नाही.